22 October 2020

News Flash

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात १,२५९ रुग्ण

चोवीस तासांत ३६ जणांचा करोनामुळे मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार २५९ करोना रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ९७ हजार इतकी झाली आहे. दिवसभरात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींचा आकडा ४ हजार ९८३ वर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ३४९, नवी मुंबईतील ३४८, कल्याण-डोंबिवली शहरातील २५१, मीरा-भाईंदर शहरातील १६२, भिवंडी शहरातील ४२, ठाणे ग्रामीणमधील ४०, बदलापूर शहरातील ३०, उल्हासनगर शहरातील २१ आणि अंबरनाथ शहरातील १६ रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ८, मीरा-भाईंदरमधील ६, बदलापूरमधील ६, ठाणे शहरातील ५, नवी मुंबईतील ४, ठाणे ग्रामीणमधील ४, अंबरनाथमधील २ आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:17 am

Web Title: 1259 patients in a day in thane district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 रोह्यातील ‘नाणार’ प्रकल्पही बारगळणार?
2 ठाणे, कल्याणमध्ये वाहतूक बदल
3 कल्याण-महापे मार्गावर कोंडमारा
Just Now!
X