News Flash

वसईत आणखी १४ जणांना करोनाची लागण

वसई विरार महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार शनिवार संध्याकाळपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या १५० वर पोहोचली आहे.

संग्रहित छायाचित्र

वसई-विरार शहरामध्ये शनिवारी एकाच दिवशी १४ नव्या करोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या आता १५० एवढी झाली आहे. वसई-विरार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

मात्र शनिवारी संध्याकाळी दिवसभरामध्ये सर्वाधिक म्हणजे १४ नवीन रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये विरारमधील आठ तर नालासोपारा मधील सहा रुग्णांचा समावेश समावेश आहे. यामध्ये १० महिन्यांच्या चिमुकला आणि आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

वसई विरार महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार शनिवार संध्याकाळपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या १५० वर पोहोचली आहे. त्यामध्ये आतापर्यंत साठ रूग्ण करुणा मुक्त झालेले असून ८० जण उपचार घेत आहेत तर १० रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 9:11 pm

Web Title: 14 new corona patient in vasai dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालघर जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या १० जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
2 पालघरमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी आज मध्यरात्री वसई वरुन सुटणार विशेष ट्रेन
3 शहापुरातील करोना रुग्णांची संख्या पाचवर
Just Now!
X