News Flash

रक्षकच झाला भक्षक! सोसायटीच्या गार्डकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पोलिसांकडून नराधमांचा शोध सुरु

(प्रतिकात्मक छायाचित्र)

डोंबिवली येथील खंबाळपाडा येथील एका सोसायटीत अल्पवयीन मुलीवर सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिक्युरीटी गार्डसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, डोंबिवलीतील खंबाळपाडा भागातील सोसायटीमध्ये राहणारी ही मुलगी १५ मेच्या दिवशी रात्री पोटात दुखू लागल्याने औषध आणण्यासाठी गेली होती. मेडिकलमधून औषध आणून परतत असताना इमारतीच्या गार्डने तिला अडवले. तसेच या मुलीला काही कळायच्या आत इतर दोघांनी तिला पकडले. यापैकी एकाने या मुलीच्या नाकावर क्लोरोफॉर्म असलेला रुमाल ठेवला. त्यानंतर या मुलीची शुद्ध हरपली.

या तिघांनी या मुलीला त्यांच्याकडे असलेल्या कारमधून निर्जन भागात घेऊन गेले. या ठिकाणी सिक्युरीटी गार्डने या मुलीवर बलात्कार केला. तर इतर दोघांनीही या मुलीला या प्रकाराबद्दल कोणाला सांगशील तर याद राख असे म्हणत धमकावले असेही या मुलीने म्हटले आहे. या मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली त्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्यात या मुलीने धाव घेतली. या मुलीने आपल्यासोबत काय घडले ते सगळे आई वडिलांना सांगितले. यानंतर या पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सिक्युरिटी गार्डसह एकूण तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पॉक्सो कायद्यानुसार या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणातील नराधमांचा शोध घेत आहेत. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 7:40 pm

Web Title: 15 year old girl abducted raped by housing society guard
Next Stories
1 रिक्षावाल्यांच्या मुजोरीला चाप!
2 मीठबंदरच्या तोफांचे जतन होणार!
3 कळवा रुग्णालयात लवकरच मातृदुग्ध संकलन वाहिका
Just Now!
X