News Flash

Coronavirus : ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात १,५६६ रुग्ण

शनिवारी दिवसभरात ७५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र

ठाणे : जिल्ह्य़ात शनिवारी १ हजार ५६६ नवे करोना रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९६ हजार ९६० वर पोहोचली आहे.

शनिवारी दिवसभरात ७५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्यांपैकी ४० रुग्ण हे भिवंडी शहरातील आहेत.शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये भिवंडीतील ४०, कल्याण-डोंबिवलीतील १०, नवी मुंबईतील ७, मीरा-भाईंदरमधील ५, ठाणे शहरातील ४, उल्हासनगरमधील ४, ठाणे ग्रामीणमधील ४ आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

भिवंडीतील मृत्यू संख्येबाबत  पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, शनिवारी दगावलेले सर्व रुग्ण ठाणे आणि मुंबईत उपचार घेत होते. भिवंडी शहरातील रुग्णालयांमध्ये एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 3:15 am

Web Title: 1566 new covid 19 patients found in thane district zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पावसाची ‘झाडे’झडती
2 धरणांत जलभरणा
3 रस्त्यांची चाळण
Just Now!
X