News Flash

ठाणे जिल्ह्यात १,५६८ नवे रुग्ण, २६ जणांचा मृत्यू

एकूण  रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ३७  झाली आहे

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्यत सोमवारी १ हजार ५६८ नवे करोनाबाधित आढळून आल्याने  एकूण  रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ३७  झाली आहे. तर, जिल्ह्य़ात दिवसभरात २६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या ३ हजार ७५१ झाली आहे. सोमवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ४८५, नवी मुंबईतील ३३१, ठाणे शहरातील २७४, मीरा-भाईंदरमधील २१६, ठाणे ग्रामीणमधील ११९, बदलापूरमधील ५५, अंबरनाथमधील ४१, उल्हासनगरमधील ३९ आणि भिवंडीतील ८ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर करोनाबाधित

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना करोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. रविवारी रात्री त्यांना खोकला आणि तापाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली.

उपचारासाठी त्यांना मुलुंड येथील  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गणेशोत्सवाच्या काळात बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:43 am

Web Title: 1568 new patients 26 deaths in thane district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना करोनाची बाधा
2 ठाण्यात करोना रुग्णाची आत्महत्या
3 कल्याण : गणपतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील ३० जणांना करोना
Just Now!
X