14 August 2020

News Flash

ठाणे जिल्ह्य़ात १,५७६ जणांना संसर्ग

२४ तसांत ३७ रुग्ण दगावले

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार ५७६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ८४ हजार ३६४ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्य़ात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ३२१ इतकी झाली आहे.

जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या १ हजार ५७६ रुग्णांमध्ये नवी मुंबईतील ३६०, कल्याण-डोंबिवली शहरातील ३२९, ठाणे शहरातील २७७, ठाणे ग्रामीणमधील २०६, मीरा-भाईंदर शहरातील २०५, उल्हासनगरमधील ६८, बदलापूरमधील ६७, अंबरनाथ शहरातील ३९ आणि भिवंडीतील २५ रुग्णांचा समावेश आहे. तर कल्याण-डोंबिवलीतील ११, ठाण्यातील १०, नवी मुंबईतील चार, उल्हासनगरमधील चार, मीरा-भाईंदरमधील तीन, ठाणे ग्रामीणमधील तीन आणि अंबरनाथमधील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:30 am

Web Title: 1576 people infected in thane district abn 97
Next Stories
1 ईदचे बकरे ठाण्याच्या वेशीवरच
2 भिवंडीतील निम्मे यंत्रमाग बंदच
3 जिल्ह्यात दहावी निकालाचा उच्चांक
Just Now!
X