05 March 2021

News Flash

ठाणे जिल्ह्य़ात १,६९१ नवे बाधित

एकूण मृत्यूसंख्या २ हजार ९ इतकी झाली आहे.

जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे क्रिकेट बोर्ड एका दौऱ्यावर जाताना मोठा संघ पाठवत आहेत.

 

जिल्ह्यात बुधवारी १ हजार ६९१ करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या ७२ हजार २०४ इतकी झाली आहे. बुधवारी जिल्ह्य़ात ४० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूसंख्या २ हजार ९ इतकी झाली आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कल्याण डोंबिवली शहरातील ४२१, ठाणे शहरातील ३२७, नवी मुंबईतील ३०३, ठाणे ग्रामीणमधील १९९, उल्हासनगरमधील १५१, मीरा-भाईंदर शहरातील ११६, बदलापूर शहरातील ७०, अंबरनाथमधील ६९ आणि भिवंडीतील ३५ रुग्णांचा समावेश आहे. तर, बुधवारी जिल्ह्य़ात ४० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील ८, नवी मुंबईतील ६, ठाण्यातील ५, मीरा-भाईंदरमधील ५, उल्हासनगरमधील ५, बदलापुरातील ४, अंबरनाथमधील ३ तर भिवंडी आणि ठाणे ग्रामीणमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:27 am

Web Title: 1691 newly affected in thane district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाण्यात ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणारी टोळी अटकेत
2 काढय़ांमुळे आल्याला चढा भाव
3 सततच्या टाळेबंदीने चप्पल, बॅगविक्रेत्यांची परवड
Just Now!
X