६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू;  मिरा-भाईंदरमध्ये १७ जणांना लागण

विरार : वसई विरार शहरातील करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी एकूण  दोन रुग्णांचा मृत्यू झाला त्यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. दरम्यान, मिरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे.

वसई-विरार शहरात रविवापर्यंत एकूण  १४ करोनाबाधीत रुग्णांची संख्या होती. सोमवारी त्यात तीन नव्या रुग्णांची भर पडली. यातील नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६५ वर्षीय रुग्णांचा उपचार दरम्यान रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला सदराचा रुग्ण हा मुंबईच्या तारांकित हॉटेलमध्ये कामाला होता. त्याला डायलिसीसचा त्रास होता म्हणून तो उपचारासाठी नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात दाखल झाला होता. सोमवारी दुपारी नालासोपाऱ्यातील पेल्हार येथील एका ३८ वर्षीय गर्भवती महिलेचाही करोनामुळे मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या मुंबई नायर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. या महिलेचा मृ्त्यू शनिवारी झाला होता. सोमवारी तिचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आला. या महिलास एक वर्षांची मुलगी व पती असा परिवार आहे. पालिकेने त्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण वसईच्या आनंद नगर परिसरातील असून तो पहिल्या मृत पावलेल्या रुग्णाचा नातेवाईक आहे. त्याचे वय ६७ वर्ष आहे. तर दुसरा रुग्ण नालासोपारा सेन्ट्रल पार्क परिसरात आढळला असून तो सुद्धा मुंबईच्या तारांकित हॉटेलमधील कर्मचारी असून त्याचे वय ५७ वर्ष आहे. तर वसई पूर्व परिसरात डी मार्ट जवळ एक ३८ वर्षीय महिला करोना बाधित आढळली आहे. ती करोना रुग्णाच्या सानिध्यात आल्याची माहिती आहे.

संपर्कात आल्याने लागण

नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण वसईच्या आनंद नगर परिसरातील आहे. तो पहिल्या मृत पावलेल्या रुग्णाचा नातेवाईक आहे. त्याचे वय ६७ वर्ष आहे. तर दुसरा रुग्ण नालासोपारा सेन्ट्रल पार्क परिसरात आढळला आहे. तोसुद्धा मुंबईच्या तारांकित हॉटेलमधील कर्मचारी असून त्याचे वय ५७ वर्षे आहे. तर वसई पूर्व परिसरात डी-मार्टजवळील एक ३८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. ती करोनाबाधित रुग्णाच्या सान्निध्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा परिसर महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आला आहे. हा परिसर र्निजतुक करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. यातील बहुतेक रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झालेले आहेत. ३० हून अनेक रुग्णांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.

आयुक्त अलगीकरणात

वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना अलगीकरणा ठेवण्यात आले आहेत. तर पालिकेच्या रुग्णालयात काम करणार्म्या दोन कर्मााऱ्यांनाही  अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हेरवाडे यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यामुले खबरदारी म्हणून त्यांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.