News Flash

ठाणे जिल्ह्य़ात १७१ नवे रुग्ण

करोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ५४९

संग्रहित छायाचित्र

ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी १७१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे करोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ५४९ इतकी झाली आहे. मंगळवारी  ठाणे शहरात ४६ रुग्ण आढळले.

कल्याण-डोंबिवलीमध्ये २१, भिवंडीत १, उल्हासनगरमध्ये ३, बदलापूरमध्ये ६, मिरा-भाईंदरमध्ये ५ नवे रुग्ण मंगळवारी आढळले. मंगळवारी एका दिवसात नवी मुंबई शहरात ७७ करोनाबाधित आढळले असून, शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ८५६ वर पोहोचली.

दरम्यान, वसई -विरार शहरात मंगळवारी १३ नवे रुग्ण आढळून आले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २३९ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:48 am

Web Title: 171 new patients in thane district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शहापुरात आज आढळले करोनाचे ८ रुग्ण
2 शहापुरात ३० बेडचे करोना केअर सेंटर सुरु, दोन रुग्णांची करोनावर मात
3 Coronavirus Outbreak : चिंतेची छाया!
Just Now!
X