News Flash

विरारमध्ये आंघोळीच्या टबमध्ये बुडून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

आंघोळीच्या टबमध्ये बुडून एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना विरारमध्ये घडली.

आंघोळीच्या टबमध्ये बुडून एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी विरारमध्ये घडली. मुलीची आई कचरा टाकण्यासाठी म्हणून घराबाहेर गेली होती. तेवढया वेळात ही घटना घडली. विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अवनी सोनावणे असे मृत मुलीचे नाव आहे.

विरार पूर्वेला चंदनसार येथे नित्यानंद अपार्ट्मेंटमधील दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये सोनावणे कुटुंब राहते. अवनी टबमध्ये बुडाली त्यावेळी आई जयश्री घराबाहेर होती तर वडिल भारत कामावर होते. जयश्री इमारतीच्या खाली असलेल्या कचरा कुंडीत कचरा टाकून घरी आल्या तेव्हा अवनीचे डोके टबमध्ये बुडालेले होते. जयश्री यांनी लगेच अवनील उचलले व जवळच्या रुग्णालयात घेऊन गेल्या. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर अवनीला मृत घोषित केले.

घरातील बाथरुममध्ये पाण्याने भरलेला हा टब ठेवला होता. अवनी तिथे स्वत: चालत गेल्याची शक्यता आहे. अवनीला आंघोळ घालण्यासाठी जयश्री यांनी टब पाण्याने भरला होता असे पोलिसांनी सांगितले. अवनी बाथरुममध्ये जाऊन पाण्याबरोबर खेळत असताना ती टबमध्ये पडली. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 1:20 pm

Web Title: 18 month old drowns falling into bathing tub at home dmp 82
Next Stories
1 ‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत ठाण्यात टॅक्सी ड्रायव्हरला मारहाण
2 युवकाला ‘जय श्रीराम’ची सक्ती; तिघांना अटक
3 पावसाळय़ातही मेट्रोची कामे
Just Now!
X