27 October 2020

News Flash

ठाणे जिल्ह्यात १,८४९ जणांना संसर्ग

दिवसभरात ३६ जणांचा करोनामुळे मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार ८४९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या १,७६, ८६१ झाली आहे. तर, दिवसभरात ३६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ४ हजार ४९४ झाली.

नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ४१६, नवी मुंबईतील ३८३, कल्याण-डोंबिवली शहरातील सर्वाधिक ३७३, मीरा-भाईंदर शहरातील २४२, ठाणे ग्रामीणमधील १८४, बदलापूर शहरातील ७९, भिवंडी शहरातील ६६, अंबरनाथ शहरातील ५६ आणि उल्हासनगर शहरातील ५० रुग्णांचा समावेश आहे. तर, गुरूवारी जिल्ह्य़ात ३६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील ८, मीरा-भाईंदरमधील ७, ठाणे ग्रामीणमधील ६, कल्याण-डोंबिवलीतील ५, नवी मुंबईतील ४, उल्हासनगरमधील ३, भिवंडीतील २ आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:32 am

Web Title: 1849 infected in thane district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 वसई-विरारमधील उड्डाणपुलांची दुरवस्था
2 खुल्या रंगमंच बांधकामाची सहा वर्षे रखडपट्टी
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आयुक्तालयाचे ई-लोकार्पण
Just Now!
X