11 August 2020

News Flash

ठाणे जिल्ह्य़ात २४ तासांत १,९४८ रुग्ण; ४५ जणांचा मृत्यू

जिल्ह्य़ातील मृतांचा आकडा १ हजार २२१

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्ह्य़ात शनिवारी १ हजार ९४८ नवे करोनाबाधित आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ४० हजार ५४२ वर पोहोचली आहे.

शनिवारी दिवभरात ४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्य़ातील मृतांचा आकडा १ हजार २२१ इतका झाला आहे.

शनिवारी आढळलेल्या बाधितांत कल्याण-डोंबिवली शहरातील ५५५, ठाणे शहरातील ४०८, नवी मुंबईत २५७, उल्हासनगर शहरातील २१२, ठाणे ग्रामीणमधील १७३, मीरा-भाईंदरमधील १२६, भिवंडीतील ७७ आणि बदलापूरमधील ४६ रुग्णांचा समावेश आहे. तर, शनिवारी ४५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ठाण्यातील १७, नवी मुंबईतील ७, मीरा-भाईंदरमधील ६, कल्याण-डोंबिवलीतील ५, ठाणे ग्रामीणमधील ४, उल्हासनगर ३, तर भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापुरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:58 am

Web Title: 1948 patients in 24 hours in thane district 45 died abn 97
Next Stories
1 रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने तरुणाचा रिक्षातच मृत्यू
2 संख्येच्या नको, रुग्णांच्या व्यवस्थापनावर लक्ष द्या – देवेंद्र फडणवीस
3 मुंबईपेक्षा आता ठाण्यात करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जास्त!
Just Now!
X