जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ९९५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार १३४ वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात २९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४ हजार ८२ इतका झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ५९१, ठाणे शहरातील ४०९, नवी मुंबईतील ३६८, मीरा-भाईंदरमधील १९२, ठाणे ग्रामीणमधील १७९, बदलापूरमधील ९१, उल्हासनगर शहरातील ७१, अंबरनाथमधील ५७ आणि भिवंडी शहरातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.

तर, शुक्रवारी जिल्ह्य़ात २९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील ७, मीरा-भाईंदरमधील ६, ठाणे शहरातील ४, नवी मुंबईतील ४, ठाणे ग्रामीणमधील ३, उल्हासनगरमधील ३ तर, अंबरनाथ आणि भिवंडीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

देशात ५२ लाखांहून अधिक करोना रुग्ण

नवी दिल्ली (लोकसत्ता विशेष प्रतिनिधी): देशातील करोना रुग्णांची संख्या ५२ लाख १४ हजार ६७७ झाली आहे. पन्नास लाखांहून अधिक रुग्णसंख्या असलेला भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ९६ हजार ४२४ नव्या रुग्णांची भर पडली असून ११७४ मृत्यू झाले. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८४ हजार ३७२ वर पोहोचला आहे. देशात उपचाराधीन रुग्ण १० लाख १७ हजार ७५४ असून करोनामुक्त रुग्ण ४१ लाख १२ हजार ५५१ आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ८७ हजार ४७२ रुग्ण बरे झाले.