पालिकेच्या स्वस्त, शुद्ध पाणी प्रयोगाला सुरुवात; घोडबंदर येथील किंगकाँग नगरीत पहिला प्रकल्प
ठाणे शहरातील काही वसाहतींमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मंगळवारी घोडबंदर मार्गावरील किंगकाँग नगरात करण्यात आला. ठाणे महापालिका, वॉटर लाइफ इंडिया आणि डीटो फाऊं डेशन या संस्थांनी संयुक्तपणे हा प्रकल्प आखला असून महापालिकेच्या बोअरवेलमधून उपलब्ध होणारे पाणी शुद्ध करून ते पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भागातील रहिवाशांना अवघ्या सात रुपयांत २० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली होती. शहरातील झोपडपट्टी भागात पुरेशा प्रमाणात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्या होत्या. अनेक भागांमध्ये पाणी वितरण व्यवस्था अत्यंत जुनी आहे. काही ठिकाणी गटारांमधून जलवाहिन्या गेल्या असून गंजलेल्या वाहिन्यांमुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा काही वस्त्यांमध्ये होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. जुनी जल वितरण व्यवस्था बदलण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेने आखली आहे. यासाठी खासगी संस्थेसोबत शुद्ध पाण्याचे प्रक्रिया केंद्र उभारणीस मंजुरी देण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वयित झाली आहे.सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत पाणी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प किती यशस्वी ठरतो हे तपासून आझादनगर, कळवा मनीषा नगर, अकलेश्वर नगर या भागांत अशा प्रकारचे प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र खडताळे यांनी दिली. बाजारात एक लिटर पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये मोजावे लागतात. येथे अवघ्या ३५ पैशांत एक लिटर पाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या वेळी डीटो फाऊंडेशन आणि वॉटर लाइफ इंडियाचे व्ॉन मीरवीझीक, शहाना भौमिक, सुदेश मेनन, इंद्रायनी दास, मोहन रानबोअरे, भावना मनोहर डुंबरे आणि स्थानिक नगरसेविका बिंदू मढवी आदी उपस्थित होते.

ठाणे शहरात विविध भागांमध्ये अशाप्रकारचे १० वितरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. यापैकी पहिला प्रकल्प घोडबंदर मार्गावरील विजय नगरी भागात सुरु झाला आहे. बोअरवेल मधील पाणी या प्रक्रिया केंद्रात टाकून ते शुद्ध करुन पाण्याच्या टाकीत सोडण्याची ही यंत्रणा आहे. त्यानंतर येथे पाणी घेण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना स्मार्ट कार्डद्वारे पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. रोज 24 हजार लीटर पाणी या टाकीत उपलब्ध होणार आहे.
भावना डुंबरे, अध्यक्षा, अर्पण फाऊं डेशन

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या