News Flash

बदलापुरात २१ जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्या ७४२ वर

१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

बदलापुरात २१ जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्या ७४२ वर

बदलापुरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती काहीकेल्या नियंत्रणात येण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. सोमवारी शहरातील २१ रुग्णांचा अहवाल पॉजिटीव्ह आला असून, एकूण रुग्णसंख्या ७४२ वर पोहचली आहे. आतापर्यंत १५ जणांनी करोनाशी सामना करताना आपले प्राण गमवाले असून २८ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अवश्य वाचा – अंबरनाथ शहरात ६ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

सोमवारी पॉजिटीव्ह आलेल्या २१ रुग्णांपैकी ६ रुग्ण हे याआधी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. ८ व्यक्ती या कामासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करत होत्या. उर्वरित ७ रुग्णांना नेमका कशामुळे संसर्ग झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. शहरातील ३६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून ३५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तब्बल ९०० व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आलंय. त्यामुळे आगामी काळात स्थानिक प्रशासन या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 6:53 pm

Web Title: 21 new covid 19 patients found in badlapur city psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अंबरनाथ शहरात ६ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय
2 मोठी बातमी! १ जुलैपासून ठाणे शहरात पुन्हा लॉकडाउन जाहीर
3 …अन्यथा ठाणेकरांवर कडक कारवाई करणार, पोलिसांचा इशारा