News Flash

पावसामुळे ठाण्यातील खारेगाव करोना रुग्णालयातून २२ रुग्णांना हलविले

कळवा येथील खारेगाव भागातील भूमीपूत्र मैदानात महापालिकेने गेल्यावर्षी करोना केंद्र उभारले होते.

करोना रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणारे पीपीई कीटमधले वैद्यकीय कर्मचारी (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे एमएमआर क्षेत्रात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कळवा-खारेगाव भागातील भूमीपूत्र मैदानातील करोना केंद्रातील २२ रुग्णांना सोमवारी सायंकाळी पालिकेच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयात हलविले.

कळवा येथील खारेगाव भागातील भूमीपूत्र मैदानात महापालिकेने गेल्यावर्षी करोना केंद्र उभारले होते. रुग्ण संख्येत घट झाल्यानंतर हे केंद्र पालिकेने बंद केले होते. यंदाच्यावर्षी मार्च महिन्यात शहरामध्ये पुन्हा करोना संसर्ग वाढला. त्यावेळेस रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जागा मिळत नव्हत्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच भूमीपूत्र मैदानामधील करोना केंद्र पुन्हा सुरू केले होते. याठिकाणी प्राणवायूची गरज असलेले २२ रुग्ण उपचार घेत होते. सोमवारी झालेल्या पावसामुळे मैदानात पाणी जमा झाले होते. तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे एमएमआर क्षेत्रात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पाऊस झाला तर त्याचा फटका मैदानातील करोना केंद्राला बसण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 2:44 am

Web Title: 22 patients shifted from kharegaon corona hospital in thane due to heavy rains zws 70
Next Stories
1 पाणीपुरवठ्यावर परिणाम
2 वादळामुळे दाणादाण
3 रुग्णसंख्येत घट; मृत्यूंची चिंता
Just Now!
X