News Flash

सासरच्या जाचाला कंटाळून बोईसर स्थानकात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, रेल्वेसेवा विस्कळीत

सोमवारी सकाळी मोहम्मद तमन्ने शेख हा तरुण हातात चाकू घेऊन बोईसर स्थानकात पोहोचला.

तो स्थानकातील पादचारी पुलावर गेला आणि ओव्हर हेड वायरजवळ उभे राहून आत्महत्येचा प्रयत्न करु लागला.

पश्चिम रेल्वेवरील बोईसर रेल्वे स्थानकात २३ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने रेल्वे प्रशासनाने ओव्हर हेड वायरचा वीज पुरवठा खंडीत केल्याने अनर्थ टळला आहे. मात्र, या गोंधळामुळे बोईसरवरुन डहाणूकडे जाणारी रेल्वे वाहतूक सकाळी जवळपास एक तास ठप्प होती.

सोमवारी सकाळी मोहम्मद तमन्ने शेख हा तरुण हातात चाकू घेऊन बोईसर स्थानकात पोहोचला. यानंतर तो स्थानकातील पादचारी पुलावर गेला आणि ओव्हर हेड वायरजवळ उभे राहून आत्महत्येचा प्रयत्न करु लागला. हा प्रकार पाहताच स्थानकातील प्रवाशांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.जवळपास तासाभरानंतर मोहम्मदची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात यश आले.

मोहम्मदने सासरच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलले होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे तासभर ठप्प होती. दुपारपर्यंत या मार्गावरील गाड्या उशिराने धावत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 1:11 pm

Web Title: 23 years attempt suicide on boisar railway station try to touch overhead wire
Next Stories
1 मावशीचं प्रेम मिळवण्यासाठी केलं मुलाचं अपहरण, क्राइम ब्रांचकडून २४ तासांत प्रकरणाचा उलगडा
2 कल्याणमध्ये पबजीच्या वादातून बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले
3 ठाण्यातील रुग्णालयातून रेल्वेने ५० मिनिटांत यकृत मुंबईत
Just Now!
X