कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका, खाटा, प्राणवायू, अत्यावश्यक कक्ष, लसीकरण, औषध साठा या सर्व वैद्यकीय सुविधांची माहिती विनाअडथळा तत्परतेने मिळण्यासाठी प्रशासनाने ३४ अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक प्रशासनाने जाहीर केले आहेत.

रात्रीच्या वेळेतही करोना रुग्णांना सर्व वैद्यकीय सुविधांची माहिती मिळावी यासाठी विशेष माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पालिका हद्दीतील करोना रुग्णालय, काळजी केंद्रात पुरेशा खाटा, प्राणवायू सुविधा असूनही काही रुग्णालय चालक खाटा उपलब्ध नाहीत तसेच लसींचा पुरवठा नाही अशी माहिती रुग्ण तसेच नातेवाईकांना देत असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णवाहिका काही रुग्णांना वेळेत उपलब्ध होत नाही अशा तक्रारी आहेत. आजारी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या प्रकाराने खचून जातात. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने विशेष माहिती कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वाचे करोना लसीकरण सुरू होणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये तसेच करोना संसर्गाचे अंतर नियमन पाळण्यात यावे यासाठीही विशेष कक्षही सुरू करण्यात आला आहे.

* माहिती कक्ष प्रमुखपदाची जबाबदारी उपायुक्त डॉ. दीपक सावंत (मो. ९८६७२५१४१४), आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक निकम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

* रुग्णवाहिका नियोजन – उपायुक्त रामदास कोकरे (मो.९८२३२२९०३३), उपप्रमुख-मधुकर कोळेकर.

* प्राणवायू नियोजन- उपायुक्त सुधाकर जगताप (मो.८८०६८०१०००), उपप्रमुख- डॉ. समीर सरवणकर.

* औषधपुरवठा- डॉ. अश्विनी पाटील(मो.९९६९६२१३३३), उपप्रमुख डॉ. समीर सरवणकर

* चाचणी केंद्र- डॉ. प्रतिभा पानपाटील (मो.९८२१७२३३०५), उपप्रमुख-डॉ. श्रीजीत पानीकर

* करोना मृत्यू- सचिव संजय जाधव (मो. ९२२४५८३८४०), उपप्रमुख-शशिम केदार.

* शास्त्रीनगर रुग्णालय-डॉ. सुहासिनी बढेकर (मो.९७६९२३२८०२), उपप्रमुख-डॉ. संजय साळी.

* सावळाराम क्रीडासंकुल-डॉ. नीलेश सोनवणे (मो. ९८२१७२३३०५), उपप्रमुख-डॉ. दीपक राठोड

* टाटा आमंत्रा-प्रमोद मोरे(मो.९९२००३७९२२), डॉ. दीपाली मोरे.

* डोंबिवली जिमखाना-डॉ. साहिल शेख (मो.७९७७८०९९२३), उपप्रमुख-डॉ. नसरीन.

* पाटीदार भवन-म्डॉ. मयूर पांगरे(मो. ९३२१३४१२४८), उपप्रमुख-डॉ. दीप्ती मुकादम.

* रुक्मिणीबाई रुग्णालय-डॉ. प्रज्ञा टिके(मो. ९८२१०११६३१), डॉ. गणेश डोईफोडे, रात्र माहिती कक्ष- ८५९१३७७२२९. ८५९१३७३९३६