News Flash

शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

७ ऑगस्टला काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

काश्मीर येथे घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मीरा रोडच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

७ ऑगस्टला काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते. यासंदर्भात मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी मेजर राणे यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. याचसोबत मीरा-भाईंदर महापालिकेनेही राणे कुटुंबीयांना ११ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला, अशी माहिती महापौर डिंपल मेहता यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:48 am

Web Title: 25 lakhs help to shaheed kaustubh ranes family
Next Stories
1 मीरा-भाईंदरच्या क्रीडासंकुलात उपाहारगृह
2 मीरा-भाईंदरमध्येही ‘निर्भया’ पथक
3 जूचंद्र येथे आजपासून फिरते वीजबिल भरणा केंद्र
Just Now!
X