News Flash

१२ तासात होणार २५ हजार वडे तळण्याचा विक्रम

रेकॉर्ड वीराचा सन्मान होणार गिरीश ओक यांच्याकडून

डोंबिवली येथील उत्सव या महोत्सवात २५ हजार वडे तळण्याचा विक्रम

डोंबिवलीतल्या उत्सव या महोत्सवात २५ हजार वडे तळण्याचा विक्रम सुरु झाला आहे. सकाळी १० वाजल्यापासून या विक्रमाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० ते रात्री १० अशा १२ तासात हे वडे तळले जाणार आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता १५०० किलो बटाटे, ५०० लिटर तेल, ३५० किलो बेसन आणि इतर साहित्य घेऊन या वडे तळण्यास सुरुवात झाली आहे. ७० ते ८० जणांची टीम उत्सव या महोत्सवाच्या व्यासपीठावरुन १२ तास तापलेल्या तेलाच्या कढईसमोर उभं राहून २५ हजार वडे तळणार आहेत. एका तासाला साधारण २५०० वडे तळायचे असा या टीमचा मानस आहे. या विक्रमासाठी १० लाखांचा खर्च झाला असून डोंबिवलीतील अनेक दानशूर व्यक्तींनी यासाठी आर्थिक मदत केली.

पाहा व्हिडीओ

प्रसिद्ध शेफ सत्येंद्र जोग यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून या उपक्रमाची नोंद घेतली जाणार आहे. १५ वर्षांपासून उपहारगृह सल्लागार म्हणून काम करणाऱ्या जोग यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी काम केलं आहे. बटाटावडा जगभरात पोहचावा या उद्देशाने त्यांना ही अभिनव कल्पना सुचली. जी आज प्रत्यक्षात येते आहे.

बटाटावडा म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतंच. डोंबिवलीत तर ठाकूर वडापाव, गोरे वडापाव प्रसिद्ध आहेतच शिवाय अनेक ठिकाणी गाडीवर मिळणाराही वडापाव प्रसिद्ध आहे. ठाण्यात कुंजविहार, तांबे, आमंत्रण या ठिकाणी मिळणारा वडापाव फेमस आहे. अशा या वड्याला जागतिक किर्ती मिळावी म्हणून जोग यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. रात्री १० वाजता रेकॉर्ड वीराचा सन्मान प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांच्याकडून केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 3:29 pm

Web Title: 25 thousand batata vada will be made in dombivali utsav festival for limca book scj 81
Next Stories
1 वसईकरांचे पाणी अशुद्ध?
2 आणखी एक तलाव मरणपंथाला
3 रब्बी पिकांवर ‘अवकाळीचे ग्रहण’
Just Now!
X