News Flash

बदलापुरात २६ व्यक्तींना करोनाची लागण, रुग्णसंख्या ५०० पार

अनेक रुग्ण याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात

ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत आज २६ जणांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे शहराची एकुण रुग्णसंख्या आता ५२७ पर्यंत पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आता प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे. आतापर्यंत ११ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले असून अद्याप ६६ अहवाल प्राप्त होणं बाकी असल्यामुळे आगामी काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

शनिवारी पॉजिटीव्ह आढळलेल्या २६ रुग्णांपैकी १२ जणं याआधी करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली होती. ५ व्यक्तींना करोनाचा संसर्ग नेमका कसा झाला याचं कारण समजू शकलेलं नाही. तर उर्वरित रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी दररोज घराबाहेर पडत असताना त्यांना ही लागण झाल्याचं कळतंय. यामध्ये नगरपारिकेच्या रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाचाही समावेश आहे. शहरातील २४२ रुग्णांवर उपचार सुरु असून २७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 7:04 pm

Web Title: 26 corona positive patients found in badlapur at saturday psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भिवंडीत मृत्यू वाढल्याने कब्रस्ताने अपुरी 
2 ठाणे जिल्ह्य़ात पावसाळी पर्यटनावर बंदी
3 Coronavirus : करोनाविरोधी लढय़ाचा गोंधळ
Just Now!
X