05 June 2020

News Flash

Coronavirus : ठाणे शहरातील २६ परिसर देखरेखीखाली

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेची उपाययोजना

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेची उपाययोजना

ठाणे : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आता ठाणे शहरात आतापर्यंत आढळून आलेले २६ रुग्ण राहत असलेला परिसर देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या निर्णयानुसार रुग्णाच्या घराजवळील एक किलोमीटर परिघातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून या भागात आरोग्य विभागाची पथके दररोज घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येतात का, याची पाहणी करत आहेत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेता यावा आणि या परिसरात करोनाचा संसर्ग रोखता यावा, यासाठी पालिकेकडून ही उपाययोजना केली जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शहराच्या विविध भागांत आतापर्यंत २६ रुग्ण आढळून आले आहे. शहरातील काही दाटीवाटीच्या परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून या भागात त्याच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर करोनाबाधित रुग्णाच्या घराजवळील एक किलोमीटर परिघातील परिसर देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासाठी हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना बाहेर जाण्यास तर बाहेरील व्यक्तीला आत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, करोनाबाधित रुग्ण आढळून आलेले २६ परिसर देखरेखीखाली ठेवण्यात आले असून संबंधित रुग्णाच्या घराजवळील एक किलोमीटर परिघातील परिसर प्रतिबंधित केला जात आहे. त्या ठिकाणी करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आरोग्य पथके दररोज प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांची पाहणी करीत आहेत. त्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तीची चाचणी करून पुढील उपाययोजना केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

या परिसरात देखरेख

ठाणे शहरातील काजूवाडी, दोस्ती विहार, हॅप्पी व्हॅली मानपाडा, कळव्यातील साईबाबानगर, माजिवाडा लोढा पॅराडाइज, रुणवाल गार्डन, धोबीआळी, मुंब्य्रातील अमृतनगरमधील विघ्नहर्ता इमारत, कळवा मनीषानगर, एमजी रोड नौपाडा, वृंदावन सोसायटी आणि विटावा सूर्यानगर यांसह २६ परिसर देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 2:03 am

Web Title: 26 premises under the supervision by corporation in thane city zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
2 coronavirus : ठाण्यात दोन जण करोनामुक्त
3 टाळेबंदीच्या काळात २४ लाखांचा मद्यसाठा जप्त
Just Now!
X