05 June 2020

News Flash

coronavirus : वसईच्या करोनाबाधीत रुग्णांची संख्या २९

वसईत बुधवारी ४ नवीन रुग्णांची नोंद झाली  होती.

(फोटो: मल्याळम इंडियन एक्सप्रेस डॉटकॉमवरुन)

वसई : नालासोपारा मध्ये राहणार्म्या एका ३५ वर्षीय इसमास करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा इसम इस्टेट एजंट असून त्याची परदेशी प्रवासाची कुठलाही पाश्वभूमी नाही. यामुळे वसई विरार मधील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता २९ एवढी झाली आहे.

वसईत बुधवारी ४ नवीन रुग्णांची नोंद झाली  होती. त्यात वसईतील मयत रुग्णांची पी तसेच नालासोपारा मधील करोनाबाधीत सुरक्षारक्षकाच्या पी आणि मुलाचा समावेश होता. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. गुरूवारी नालासोपारा पुर्वेच्या आचोळे येथील एका ३५ वर्षीय इसमास करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा इसम इस्टेट एजंट असून एकटाच रहात होता. त्याच्या संपर्कात असलेल्या मित्राला अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर या इसमावर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे वसई विरार शहरातील एकूण करोनाबाधीत रुग्णांची संख्या आता २९ एवढी झाली आहे. यामध्ये ६ महिला आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी केले १५ परिसर सील

ज्या भागात करोनाचे रुग्ण आढळून येतात तो परिसर पोलिसांकडून सील करण्यात येतो. आतापर्यंत पोलिसांनी वसई विरार शहरातील तब्बल १५ परिसर सील केले असून नागरिकांना ये—जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. करोनाग्रस्त रुग्ण या भागात रहात असल्याने संसर्गाची शक्यात असते त्यामुळे परिसरा सील केला जातो. पुढील सुचना येईपर्यंत हा परिसर सील ठेवण्यात येईल, असे वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:27 am

Web Title: 29 coronavirus positive cases in vasai zws 70
Next Stories
1 कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३
2 “…असे विकृत ठेचलेच पाहिजेत”, मनसेकडून जितेंद्र आव्हाड प्रकरणावर प्रतिक्रिया
3 Coronavirus Outbreak : सायंकाळी पाचनंतर किराणा, भाजीही बंद
Just Now!
X