02 March 2021

News Flash

ठाण्यात फेब्रुवारीत रंगणार ‘सायकल मित्र संमेलन’

हे संमेलनाचे दुसरे वर्ष आहे

'सायकल मित्र संमेलन'

देशभरातील सायकप्रेमींसाठी ठाण्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सायकल मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे दुसरे सायकल मित्र संमेलन डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे पार पडणार आहे. मागील वर्षी डोंबिवली येथे पहिल्या सायकल मित्र संमेलनाला मिळालेला प्रतिसाद पाहून यंदा हे संमेलन ठाण्यात आयोजित करण्यात आले आहे.

डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी २०१८ रोजी डोंबिवली येथे पहिले सायकल मित्र संमेलन पार पडले. या संमेलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर यंदा दुसरे सायकल मित्र संमेलन ठाण्यात आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी यंदा आयकॅन, री-सायकल,स्वत्व या स्वयंसेवी संस्था हे संमेलन आयोजित करणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. वैद्यकीय तज्ञ, उद्योजक आणि व्यावसायिक तसेच अनुभवी सायकलपटू ह्या संमेलनात मार्गदर्शन करणार असून त्याद्वारे आरोग्यविषयक आणि इतर रंजक माहितीही देण्यात येणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या सायकल स्वारांसाठी निवास तसेच भोजन व्यवस्था ठाणे महानगर पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

असा असेल कार्यक्रम

संमेलनाच्या दिवशी सकाळी ७ वाजता जांभळी नाका येथील शिवाजी मैदान ते काशिनाथ घाणेकर सभागृह अशी अंदाजे १० किमी लांबीच्या सायकल फेरीही आयोजित करण्यात आले आहे. या सायकल फेरीमध्ये दीड हजारहून अधिक सायकलस्वार सहभागी होणार आहेत. या सायकल संमेलनाला सायकलस्वरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांची केले आहे. सायकल फेरी सर्वांसाठी निशुल्क असून सर्व सायकलपटूंना ठाणे महानगरपालिकेतर्फे मोफत टी शर्ट, टोपी आणि नाश्ता यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमाला संस्कृतिक कार्यमंत्री आणि क्रिडा मंत्री विनोद तावडे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजय जयस्वाल यांच्यासोबतच संमेलनाध्यक्ष दीपक मेजारी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाची रूपरेषा:

१) ९ ते १० दरम्यान उदघाटन समारंभ झाल्यावर दिवंगत सायकलपटू खळे काका यांना श्रद्धांजली तसेच पुणे येथे सायकल संग्रहालय निर्माण करणारे विक्रम पेंडसे, आशियातील सर्वात तरुण आयर्नमन रविजा सिंघल यांना गौरवण्यात येईल. मुलुंडकी सायकलवाली आणि मुंबईतील ‘सायकल टू वर्क’ची आदर्श फिरोझा सुरेश यांचे विशेष लेक्चर आयोजित करण्यात आले आहे.

२) महाराष्ट्र सरकारतर्फे सायकलविषयक धोरणांची माहिती दिली जाईल.

३) त्यानंतर सायकलपटूंच्या सायकल सफरीविषयक मुलाखती घेतल्या जातील.

४) आंतरराष्ट्रीय सायकलिंग संबंधी ‘आरएएएम’मधील सहभागी डॉ महाजन बंधू, ले कर्नल भारत पन्नु, उल्हास जोशी, योगी, लिली पानीच (अमेरिका), पनिंग यामे (आसाम), टाका तामुत (अरुणाचल), संतोष दुबे (एयर फोर्स, आसाम) यांच्या मुलाखती आणि मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे.

५) ‘मेकिंग ऑफ आयर्न मॅन’ या कार्यक्रमाअंतर्गत चेतन अग्निहोत्री (आयर्न मॅन), अमर मियाजी (आयर्न मॅन), डॉ. मिलिंद पिंपरीकर, डॉ. नेमुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शनपर लेक्चर आयोजित करण्यात आले आहे.

६) त्यानंतर सांगितिक मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला जाईल.

७) तज्ञ सायकलपटू उपस्थितांना मार्गदर्शन आणि सादरीकरण (प्रेझेन्टेशन) करतील.

८) कार्यक्रमाचा समारोप होताना चार भाग्यवान विजेत्यांना ओरोबोरस व ‘के टू सायकल’ या कंपन्यांतर्फे लकी ड्रॉद्वारे ४ सायकली भेट देण्यात येतील.

संमेलनाचे शुल्क मात्र रु.३००/- ठरवण्यात आलेले आहे. त्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, टी शर्ट, स्लिंग बॅग आणि स्मरणीका या गोष्टींचा समावेश असेल. ‘बूक माय शो’च्या वेबसाईट वर संमेलनाचे ऑनलाइन बुकींग करता येईल.

‘सायकल मित्र संमेलना’मागील संकल्पना काय?

सायकल.. हे बहुधा एकमेव साधन, एकमेव छंद, एकमेव व्यायाम प्रकार असावा जो २ वर्षाच्या मुलापासून १०२ वर्षाच्या तरुणापर्यंत कोणालाही सहजसाध्य आहे. सध्या तर सायकलिंग हा जागतिक पटलावर परवलीचा शब्द झाला आहे. पर्यावरण विषयक समस्या असो, की वाहतुकीची समस्या ह्याची जागतिक व्याप्ती लक्षात घेता सायकल हे ह्या जागतिक समस्यांवरील सोपा उपाय आहे. वाहतुकीचे साधन, व्यायामाचे साधन इथपासून एक स्पर्धात्मक खेळ म्हणूनही सायकलिंगला जागतिक प्रतिष्ठा लाभली आहे. सायकलजगतातील सर्व जण एका धाग्यात बांधले जावे हे उद्दिष्ट्य समोर ठेवून ‘सायकल मित्र संमेलन’ हि संकल्पना मांडण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 6:19 pm

Web Title: 2nd cycle mitra sammelan to be held in thane cycle rally feb 2019
Next Stories
1 गुटखा विक्रीचा ‘बाह्य़वळण’ मार्ग
2 अपघातांचे दिवा फाटक बंद?
3 ‘महिला विशेष’ कुरबूर सुरूच!
Just Now!
X