भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. धक्कदायक बाब म्हणजे १ जुलै ते आता पर्यंत म्हणजे साधारण अडीच महिन्यात  तब्बल ३३८ रुग्णांनाचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्ण अधिक वाढत आहे.मंगळवारी समोर आलेल्या अहवालानुसार  १५ हजार ५९१ रुग्णांना करोनाची बाधा झाली असून आता पर्यंत ४८३ रुग्णांचा बळी गेला आहे.करोना मुक्त रुग्णानाची संख्या  १३ हजार १९१ झाली असली तरी करोनामुळे बळीचा आलेख देखील वाढत आहे. शहरात प्रति दिवस चार ते पाच रुग्ण मृत्यूचे प्रमाण आहे.त्यामुळे मृत्यू दर कमी करून करोना आटोक्यात आण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

मिरा भाईंदर शहरात करोनाचा  पाहिला  बळी ७ एप्रिल रोजी गेला होता.त्यामुळे प्रशासनामाफर्म्त कोविड रुग्णानालासह कोविड केंद्राच्या निर्मितीत भर देण्यात आली होती.

परंतु तरी देखील  मृत्यू दर ३.२१ टक्कय़ावर आला आहे.अश्या परिस्थितीत अधिकाधिक रुग्णानाची तपासणी करून त्यावर उपचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्लक्षामुळे मृत्यूत वाढ

मिरा-भाईंदर पालिकेकडून अधिकाधिक तपासणी करून रुग्ण संख्या आटोक्यात आण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, मिळालेल्या  माहितीनुसार ५० टक्क्य़ांहून अधिक रुग्ण हे लक्षणे असतानाही उपचार करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे मृत्यू पावले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित उपचार करणे गरजेचे असल्याचे आवाहन आयुक्त डॉ विजय राठोड यांनी केले.