एकीकडे मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. अशात आता कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३ झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ४३ पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.

कुठे किती रुग्ण?
कल्याण पूर्व – ८
कल्याण पश्चिम-८
डोंबिवली पूर्व-२०
डोंबिवली पश्चिम-७
टिटवाळा १

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. कल्याण डोंबिवलीत रुग्णसंख्या ४३ वर गेली आहे. सोशल डिस्टन्सिंग, घरात थांबणे, चेहऱ्याला मास्क लावणे, गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे, बाहेर पडताना मास्क लावणे या गोष्टी काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत रुग्णसंख्या ७७५

मुंबईत करोनाचे ७९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतली रुग्णसंख्या ७७५ झाली आहे. तर आज मुंबईत करोनाची लागण झाल्याने ९ जणांचा बळी गेला आहे. एकूण ६५ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.