01 October 2020

News Flash

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

एकूण मृतांची संख्या २ हजार ५९८ वर पोहोचली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार १७४ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या ९४ हजार २३२ इतकी झाली आहे. दिवसभरात ४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २ हजार ५९८ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार १७४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये नवी मुंबईतील ३६१, ठाणे शहरातील २५८, कल्याण-डोंबिवली शहरातील २०९, मीरा-भाईंदर शहरातील ११९, ठाणे ग्रामीणमधील ८५, अंबरनाथ शहरातील ५०, बदलापूर शहरातील ४७, भिवंडीतील २५ आणि उल्हासनगर शहरातील २० रुग्णांचा समावेश आहे. तर, ४४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाण्यातील १३, कल्याण-डोंबिवलीतील ८, ठाणे ग्रामीणमधील ७, मीरा-भाईंदरमधील ७, नवी मुंबईतील ५, भिवंडीतील ३ आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:29 am

Web Title: 44 death in thane district due to corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 धरणांच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ
2 वादळात सापडलेल्या मच्छीमारांची सुखरूप सुटका
3 उघडय़ा नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू
Just Now!
X