16 February 2019

News Flash

नालासोपाऱ्यातील मुलीची अपहरण करुन गुजरातमध्ये हत्या

पोलिसांनी संशयित महिला आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे

नालासोपारा येथील विजयनगर येथे राहणाऱ्या संतोष सरोज यांची मुलगी अंजलीचे अपहरण झाले होते.

चार दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यातून अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह नवसारी रेल्वे स्थानकात आढळला. मुलीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून पोलिसांनी संशयित महिला आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे.

नालासोपारा येथील विजयनगर येथे राहणाऱ्या संतोष सरोज यांची मुलगी अंजली (५ वर्ष) गुरुवारी बिल्डिंग खाली खेळत होती. बराच वेळ झाला तरी अंजली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. रविवारी रात्री अंजलीचा मृतदेह नवसारी रेल्वे स्थानकातील शौचालयात आढळला. तिला नवसारीपर्यंत कोणी नेले, तिची हत्या का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांना अंजली राहत असलेल्या बिल्डिंगजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यात अंजली एका महिलेसोबत जाताना दिसते. या आधारे पोलिसांनी महिलेचे रेखाचित्रही रेखाटले आहे. या महिलेचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशयित महिलेचे रेखाचित्र

First Published on March 26, 2018 1:50 pm

Web Title: 5 year old girl kidnapped from nalasopara killed in gujarat body found at navsari railway station