आपल्या पत्नीचा तिच्या प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडीओ मोबाईलवर पाहिल्यानंतर संतापलेल्या ५० वर्षीय इसमाने पत्नीची हत्या केली आहे. रफीक मोहम्मद युनूस असं या आरोपीचं नाव असून आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पोलिसांना शरण गेला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनूस आणि त्याची पत्नी नसरीन आपल्या ३ मुलांसह भिवंडी येथील अन्सर नगर भागात राहतात. लॉकडाउनकाळात युनूसला आपली नोकरी गमवावी लागली…यामुळे युनूसने आपल्या पत्नीसह ३ मुलांना तिच्या घरी नागाव परिसरात पाठवलं. काही दिवसांनी युनूसला आपल्या पत्नीचा तिच्या प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडीओ मोबाईलवर आला. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे संतापलेल्या युनूसने पत्नीच्या घरी जाऊन सुऱ्याने भोसकून तिची हत्या केली.
या घटनेनंतर युनूसने शांती नगर पोलीस ठाण्यात जाऊन आपला गुन्हा कबूल करत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. सोशल मीडियावर आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युनूस संतापलेला होता. समाजात काय तोंड दाखवायचं या रागातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 5:01 pm