जिल्हा प्रशासनाची सज्जता

ठाणे : करोनाच्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. हे लसीकरण पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर दहा दिवसांत एकूण ५५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नावनोंदणी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तर लशीच्या साठवणुकीसाठी देखील जिल्हा प्रशासनाने सज्जता ठेवली आहे.

देशात सध्या दोन ते तीन कंपन्यांच्या करोना लसींची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्थानिक पातळीवर लसीकरणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याच्या सूचनाही शासनातर्फे देण्यात येणार आहे. या सूचनेनुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली करोना लसीकरणासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पालिकांचे प्रशासकीय प्रमुख यांचा समावेश आहे. या समितीची ३ डिसेंबर रोजी   (पान ४वर)

लशीची साठवणूक लसीकरण केंद्रांमध्ये

जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाचे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांमधील लसीकरण केंद्रामध्ये पूर्वीपासूनच इतर लशींच्या साठवणुकीसाठी शीतपेटय़ा आणि वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध आहेत. या ठिकाणीच करोना लसीची साठवणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली.

शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यात लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. तर, पहिल्या टप्प्यातील लसीकरण्यासाठी ५५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी नावनोंदणी पूर्ण झाली आहे.

– कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक