आजी-माजी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

ठाणे : ठाणे येथील लोकपूरम भागातील सीकेपी बँकेच्या शाखेत आजी-माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा कोटी ९२ लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात आजी-माजी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी बँकेच्या संगणक प्रणालीत फेरफार करणे, बनावट खाती उघडून त्यांना कॅशक्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम उचल देणे, अशा स्वरूपाची बँकेची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत असून या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

hardik pandya marathi news, krunal pandya marathi news
पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
Aslam shah
उमेदवारी अर्जासाठी १० हजारांची चिल्लर; नाणी मोजताना अधिकाऱ्यांना एसीतही फुटला घाम, मोजणी संपल्यानंतर…

[jwplayer poPcqTHM]

अंजली पिसाळ, चंद्रशेखर कर्वे, उन्नती ठोंबरे, सतीश जांभळे, विकास कुबल, नरेंद्र जाधव आणि सत्येन सालवा अशी सात जणांची नावे आहेत. यापैकी सत्येन वगळता उर्वरित सहा जण बँकेचे अधिकारी-कर्मचारी असून त्यामध्ये शाखाधिकारी, लिपिक आणि शिपायांचा समावेश आहे. सत्येन सालवा हा बँकेचा ग्राहक असून त्याच्या फायद्यासाठी बँकेची फसवणूक केल्याचा आरोप सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे. २०११ ते २०१४ या कालवधीत बँकेची फसवणूक झाली असून, याप्रकरणी बँकेच्या एका संचालकाने ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. त्या आधारे या विभागाच्या पथकाने तपास सुरू केला होता. त्यामध्ये बँकेतील ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी अनेक खातेदारांच्या मुदत ठेवी पावत्यांची नोंद असलेल्या संगणकीय प्रणालीमध्ये फेरफार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. तसेच विविध बनावट खाती उघडून त्याद्वारे मंजूर कॅशक्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम देऊ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

[jwplayer 19exw8V5]