01 June 2020

News Flash

बदलापुरात करोना बाधित रुग्णांची संख्या १५० पार, शनिवारी आणखी ६ रुग्णांची भर

येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती

बदलापूर शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शनिवारी शहरात आणखी ६ नवीन रुग्ण आढळलेले असल्यामुळे प्रशासनासमोरील चिंतेत भर पडली आहे. शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येने १५० चा आकडा पार केला असून येत्या काही दिवसांमध्ये या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता दिसत आहे. शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असून त्यासाठी त्यांचा रोज मुंबईत प्रवास सुरु असतो. गेल्या काही दिवसांत नवीन आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये अशाच नागरिकांची संख्या जास्त असल्याचं दिसून येत आहे.

आज नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे बदलापूर पश्चिमेतील आहेत. शहरात आतापर्यंत ४ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले असून अनेक रुग्णांचे अहवाल येणं बाकी आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप ४५ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. बदलापुरातील करोना बाधित रुग्णांची सोय ही शहरातील रुग्णालयं, उल्हासनगर, ठाणे, मुंबई येथे करण्यात येत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने शहरातील ४० पेक्षा जास्त निवासी संकुल प्रतिबंधीत केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 9:15 pm

Web Title: 6 new corona positive patients found in badlapur city as total number cross 150 psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 रुग्णालये ओसंडली..
2 शाळांच्या व्हॅनमधून आता करोना रुग्णांची वाहतूक
3 बदलापुरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर, ९ जणांचा अहवाल पॉजिटीव्ह
Just Now!
X