03 June 2020

News Flash

शहापूरमध्ये करोनाबाधितांची संख्या ६१ वर

शहापूरसह तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाने थैमान घातले आहे

संग्रहित छायाचित्र

शहापूरमध्ये बुधवारी रात्री दहा रुग्ण करोना बाधित असल्याचे समोर आल्याने तालुक्यातील नागरिक धास्तावले आहेत. करोनाग्रस्तांची झपाट्याने वाढ होत असून तालुक्यात आतापर्यंत तब्बल ६१ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. शहापूर तालुक्यात करोनाच्या वाढता प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शहापूर नगरपंचायत सह तालुक्यातील सर्व बाजारपेठ ३१ मे पर्यंत कडकडीत लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहापूरसह तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाने थैमान घातले आहे. शहापुरात आत्तापर्यंत १२ तर वासिंद, कसारा, शेलवली (बां), अल्याणी, खातीवली, कळंभे आदी ठिकाणी ४९ असे एकूण ६१ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले असून या रुग्णांच्या संपर्कातील तब्बल ६३२ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तालुक्यातील करोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे भीतीचे वातावरण पसरले असून या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आमदार दौलत दरोडा यांनी आज ( २१ मे) रोजी सर्वपक्षीय पदाधिकारी व अधिकारी यांच्या सह ग्रामपंचायत प्रशासनाची आढावा बैठक शहापूर विश्रामगृह येथे घेतली. या बैठकीत २२ मे ते ३१ मे पर्यत शहापूर तालुक्यात मेडिकल व हॉस्पिटल वगळता कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत तालुक्यातील ग्रामसेवकांना तालुक्यात कडकडीत लॉकडाउन निर्णय घेण्यात आला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 8:55 pm

Web Title: 61 corona patients in shahapur as per todays toll scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 बदलापुरकरांच्या चिंतेत वाढ, सापडले १४ नवीन करोना बाधित रुग्ण
2 आज बंद, उद्या सुरू .. आज सुरू, उद्या बंद
3 शवदाहिनीतील धुराचा असह्य़ मारा
Just Now!
X