07 August 2020

News Flash

बदलापुरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, ७ जणांचा अहवाल पॉजिटीव्ह

पॉजिटीव्ह व्यक्तीमध्ये एका पत्रकाराचाही समावेश

बदलापूर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शनिवारी आणखी ७ जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहराची रुग्णसंख्या आता २१३ वर पोहचली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून येत आहे.

शनिवारी पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या ७ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत. उर्वरित दोन रुग्णांपैकी एक रुग्ण हा याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला असून एक रुग्ण हा खासगी मराठी वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम करतो. अद्याप ३२ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांत शहराच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरात आतापर्यंत ७ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, तर १०५ नागरिक उपचार घेऊन बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. बदलापुरातील करोनाग्रस्त रुग्णांवर बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, भाईंदर, मुंबई यासारख्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील ५६ रहिवासी संकुल प्रतिबंधित केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 6:54 pm

Web Title: 7 new corona positive patients found in badlapur city psd 91
Next Stories
1 अंबरनाथ, बदलापूरमध्ये आजपासून दुकाने सुरू 
2 कुळगाव-बदलापुरात सर्व दुकानं सुरु करण्यासाठी सशर्थ परवानगी
3 खासगी डॉक्टरांची माघार
Just Now!
X