मुसळधार पावसात अग्निशमन दलाच्या जवानांची धावाधाव

वसई : मागील चार दिवस झालेल्या मुसळधारा पावसात अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. वसई विरार भागात पावसाचे जोर त्याच बरोबर वादळी वारे यामुळे वसई विरारच्या विविध भागात झाडे कोसळण्याच्या घटना, आगीच्या घटना, साप आढळून आले. त्यांना पकडून अग्निशमन विभागाच्या जवानांनी नंतर जंगलात सोडले.

वसई विरार भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने वसई विरार मधील बहुतांश सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यामुळे या भगातील जनजीवन विस्कळीत झाले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध भागात अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले.

विरार येथील यशवंत नगर परिसरात देखील आठ मजूर अडकून पडले होते त्यांची देखील अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली तसेच मिठागर वस्तीला देखील पाण्याने वेढा घातल्याने या वस्तीमध्ये असलेल्या आजारी रुग्णांना देखील बोटीच्या सहाय्याने मदत करून महापालिकेच्या डी एम पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच एव्हरशाईन येथील रस्त्यावर पाणी साचल्याने चारचाकी वाहनात अडकून पडलेल्या पाच नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. वसई विरार भागात  शुRवार पासून दमदार पाऊस सुरु होता. पावासह सुटणारा सोसाटय़ाचा वारा यामुळे  विविध ठिकाणी असलेली झाडे देखील कोसळली आहेत. काही झाडे ही झाडांच्या बाजूला उभ्या असलेल्या गाडय़ांवर पडल्याने अनेक गाडय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील पाच दिवस सतत पाऊस सुरु असल्याने वसई विरार भागात एकूण ७७ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या घडलेल्या घटनेच्या ठिकाणीजाऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची छाटणी करून रस्त्यातून व इतर ठिकाणाहून  हटविण्यात आले. तसेच वारा असल्याने काही भागात शॉट सर्किट यामुळे आगी देखील लागण्याचे प्रकार घडले आहेत.

४८ साप पकडले

वसई विरार शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने वसईच्या विविध भागात पाणी घुसले होते. यामुळे या भागात गेल्या दोन दिवसापासून मोठय़ा प्रमाणात सापांचा वावर नागरीवस्ती मध्ये वाढला होता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा एकूण ४८ सापांना अग्निशमन दलाच्या जवानांनी पकडून तुंगारेश्व्र,वाराई सातिवली येथील जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने वसई विरार भागात घडणारम्य़ा प्रत्येक घटनेवर लक्ष देण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व नियंत्रण कक्ष सज्ज होता ज्या ज्या घटना या भागात घडल्या त्याचे निवारण अग्निशमन दलाच्या कर्मचारम्य़ांनी घटनास्थळी जाऊन केले आहे. तसेच ज्याप्रमाणे कॉल येईल त्याप्रमाणे अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले आहे.

-दिलीप पालव, 

मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका