शहरातील एकूण रुग्णसंख्या ११४

भाईंदर : बुधवारी मीरा-भाईंदर शहरात  एकाच दिवशी करोना बाधित ८ नव्या रुग्णांची भर पडली असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णाची संख्या ११४ झाली आहे

मीरा-भाईंदर शहरातील करोना बाधित रुग्णाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. मंगळवारी ८ नवीन रुग्ण समोर आल्याने शहरातील करोना बाधीत रुग्णांची संख्या आता ११४ एवढी झाली आहे.  बुधवारी  आढळून  आलेल्या अहवालात  चार  पुरुष  आणि चार महिला  रुग्णांचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण   मिरा रोड येथील शांती गार्डन  लक्ष्मी पार्क, परिसरात आणि  भाईंदर येथील शिवसेना गल्ली,  जेसल पार्क आणि खारी गाव परिसरात राहत होते अशी माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली

मंगळवारी  आढळून  आलेल्या अहवालात  सात  पुरुष  आणि पाच   महिला  रुग्णाचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण   मीरा रोड येथील शांती पार्क, एम टीएनएल रोड, नया नगर, प्लेजन्ट पार्क कशी गाव, शांती नगर,परिसरात आणि  भाईंदर पूर्व भागातील शिर्डी नगर,पाठक रोड तसेच इंद्रलोक परिसरात राहत असल्यामुळे या भागांना देखील खबरदारी म्हणून सील करण्यात आले असल्याची  माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.५५६ नागरिकांचे

घरातच अलगीकरण

मीरा-भाईंदर  शहरात  करोना मुळे दोघांचा बळी गेला आहे.  केवळ ११ रुग्णांनाच करोनामुक्त झाले आहेत. आजवर पालिकेकडून २,१८७ संशयित  नागरिकांची ओळख पटवण्यात आली  आहे. यापैकी ९०४ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, तर ३८३ नागरिकाना  १४ दिवसांच्या तपासणीनंतर घरी सोडण्यात आले आहे. त्याच प्रकारे ५५६ नागरिकांचे  घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच  रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या नागरिकांचा  तपास सुरू  असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत  डांगे यांनी दिली