27 September 2020

News Flash

ठाण्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या टाकीत गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू

आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले. तर तीन जणांचा टाकीत गुदमरुन मृत्यू झाला.

ठाण्यातील ढोकाळी नाका येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील टाकीत आठ कामगार अडकल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला असून पाच कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

ढोकाळी नाका येथील प्राइड प्रेसिडन्सी लक्झेरिया येथील मैदानात सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातील टाकीच्या साफसफाईसाठी आठ कामगार टाकीत उतरले. मात्र, सर्व कामगार त्या टाकीत अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या मोहीमेनंतर सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ पैकी तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या कामगारांची नावे
१. अमित पुहाल (वय २०)
२. अमन बादल (वय २१)
३. अजय बुंबक (वय २४)

जखमी कामगारांची नावे
१. विजेंद्र हतवाल (वय २५)
२. मनजित वैद्य (वय २५)
३. जसबिर पुहाल (वय २४)
४. अजय पुहाल (वय २१)
५. रुमेर पुहाल (वय ३०)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2019 7:54 am

Web Title: 8 people got stuck in stp plant at dhokali 3 dies
Next Stories
1 पालिका विद्यार्थ्यांवर शालेय साहित्य खरेदीत सक्ती?
2 ठाण्यात आंबा स्टॉलवरून मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
3 मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Just Now!
X