जिल्ह्य़ात सोमवारी ८५९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार ६२४ झाली आहे. तर, जिल्ह्य़ात दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३ हजार ३०१ झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील ३०८, कल्याण-डोंबिवली शहर १९४, ठाणे शहर १२५, ठाणे ग्रामीण ९०, मीरा-भाईंदर ७५, बदलापूर २३, अंबरनाथ १६, उल्हासनगर १४ आणि भिवंडीतील १४ रुग्णांचा समावेश आहे. ३३ मृतांमध्ये कल्याण-डोंबिवली ९, ठाणे ग्रामीण ६, मीरा-भाईंदर ६, ठाणे शहर ५, उल्हासनगर ४ आणि नवी मुंबईतील तीन रुग्णांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 12:26 am