ठाण्यात ४५ वर्षीय महिला पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आणि ठाण्यात महिला पोलिसाचा करोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत करोना रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. तसेच पोलिसांनाही करोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत महिला पोलिसाचा मृत्यू झाला नव्हता. आज ठाण्यातल्या महिला पोलिसाचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. त्या ४५ वर्षीय होत्या. आज त्यांचा मृत्यू झाला.

ज्या महिला पोलिसाचा मृत्यू झाला त्या ठाण्यात कार्यरत होत्या.पहिल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आधीच राज्यातील करोना योद्धांना करोनाची लागण होते आहे. अशात आता करोनामुळे पोलिसांचा म्हणजेच करोना योद्धांचा मृत्यू होतो आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रात करोनाची लागण झाल्याने एकाच दिवशी तीन पोलिसांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे तर दोन मुंबईतले आहेत.