News Flash

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणी अजून एक मृतदेह सापडला

मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असताना अजून एक मोठी घडामोड घडली आहे. मुंब्रा रेतीबंदर जिथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता तिथेच अजून एक मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली असून शेख सलीम अब्दुल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल सलीम मजूर असून मुंब्रा, रेतींबदर येथे वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस अधिकारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं.

बचावकार्य पूर्ण करण्यात आलेलं असून मृतदेह पोलिसांकडे सोपवण्यात आला असल्याचं आपत्ती विभाग आणि पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 11:39 am

Web Title: a body has been found at the location in reti bunder mumbra where mansukh hirans body was found sgy 87
Next Stories
1 ठाण्यात भाजपच्या १७ नगरसेवकांवर गुन्हा
2 वाझे यांना ताब्यात देण्याची ‘एटीएस’ची मागणी
3 मेट्रोच्या विकास शुल्कातून सुटका
Just Now!
X