ठाण्यातील बाजारात ग्राहकांची गर्दी; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत

गणेशोत्सवाच्या तयारीसाठीचा सोमवारचा दिवस ‘भारत बंद’मुळे व्यर्थ गेल्यामुळे मंगळवारी ठाण्याच्या बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठीच्या साहित्यापासून प्रसादाच्या मिठाईपर्यंत आणि गणरायाच्या अलंकारापासून रोषणाईच्या दिव्यांपर्यंतच्या खरेदीसाठी मंगळवारी सकाळपासूनच ठाणेकरांनी बाजाराकडे धाव घेतल्याने जांभळीनाका परिसरात दिवसभर कोंडी दिसून आली. ग्राहकांच्या गर्दीतून वाट काढणाऱ्या वाहनांना रस्त्यावर पथारी पसरून बसलेले फेरीवाले आणि बेकायदा उभी करण्यात आलेली वाहने यांच्यामुळेही वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. मंगळवारी सायंकाळनंतर तर या ठिकाणच्या कोंडीत आणखी भर पडली.

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून जांभळीनाका परिसरात ग्राहकांचा ओढा असतो. या बाजारपेठेत एरवीही ग्राहकांची गर्दी होत असली तरी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी जांभळीनाका परिसरात पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांचे अक्षरश: लोंढे उसळत असतात. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच या बाजारपेठेत दुकानांबाहेर गर्दी दिसायला सुरुवात होते. गणपती आगमनाला अवघे दोन दिवसच उरल्याने रविवारपासूनच या बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. पूजा साहित्य, सजावट वस्तू विकणाऱ्या दुकानांबाहेर रांगा लावून ग्राहक खरेदी करत आहेत. या रांगा रस्त्यावर अक्षरश: लांबवर पसरल्याने वाहतुकीसाठी असलेला अर्धा रस्ता व्यापला जात आहे. या रस्त्यातूनच पर्यावरणपूरक मखरच्या जाहिराती करणारे मोठे फलक घेऊन विक्रेते सायकलींवर फिरत असल्याने तसेच इतर वाहनांच्या तुलनेत सायकल धिम्या गतीने जात असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या लांब रांगा या रस्त्यावर लागत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी साडी विक्रेते, कपडे, पादत्राणे यांची दुकाने आहेत. या दुकानांच्या बाहेरचा अर्धा  फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो.  मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या चौकात तीन बाजूंनी वाहने येत असल्याने या अरुंद रस्त्यातून वाट काढणे वाहनचालकांना कठीण होते. त्यामुळे जांभळीनाक्यावरून येणाऱ्या बसेस या चौकात बराच वेळ अडकत असल्याने येथे वाहने समोरासमोर येऊन मोठी कोंडी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी हेच चित्र कायम आहे. या ठिकाणी तलावपाळीच्या दिशेने जाण्यासाठी  सिग्नल असल्याने एकाच वेळी जास्त वाहने आल्यास वळणावर वाहनांची कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फटका तलावपाळीच्या दिशेकडून मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे येणाऱ्या वाहनांनाही बसत आहे.

दुतर्फा पार्किंगचा त्रास

बाजारपेठेत खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची आणि दुकानदारांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. या भागात वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना येथे वाहने उभी केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. या काळात येथे वाहतुकीचे किमान नियोजन करण्याची आवश्यकता असते. मात्र, रविवारचा काही तासांचा अपवाद वगळला तर असे कोणतेही नियोजन या भागात झाले नसल्याने खरेदीसाठी येणारे आणि नियमित प्रवास करणारे प्रवासी तासन्तास कोंडीत अडकून पडत असल्याचे चित्र आहे. बुधवारी या बाजारात आणखी गर्दी उसळेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

जांभळीनाका परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहून बस वाहतूक बदलाविषयी निर्णय घेण्यात येतात. या ठिकाणी कोंडी झाल्यास गर्दीचा अंदाज घेऊन जांभळीनाका मुख्य चौकातून बसची वाहतूक टॉवरनाकामार्गे स्थानक परिसरात वळवण्यात येते. सायंकाळी ग्राहकांची जास्त खरेदी होत असल्याने या पद्धतीने ही वाहतूक वळवण्यात येईल.

– सुरेश लंबाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर वाहतूक शाखा