News Flash

चार महिन्यांपासून प्रेयसीच्या मृतदेहासोबत वास्तव्य; हत्या करुन भिंतीत गाडलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले

पालघरमधील धक्कादायक घटना

विजय राऊत, लोकसत्ता
पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरोळी येथील हे प्रेमी युगूल पळून लग्न करण्याच्या इराद्याने घर सोडून वाणगाव येथील वृंदावन दर्शन इमारतीमध्ये रहायला आलं होतं. त्याच रात्री आरोपी प्रियकराने प्रेयसी अमिता मोहितेची गळा दाबून हत्या केली. गुन्हा लपविण्यासाठी त्याने तिचा मृतदेह भिंतीमध्ये बांधकाम करून पुरून टाकला.

गेल्या चार महिन्यांपासून आरोपी प्रियकर दुसऱ्या ठिकाणी राहत होता. मृत मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

उमरोळीची अमिता मोहिते चार महिन्यांपूर्वी प्रियकराच्या प्रेमापोटी घर सोडून गेली होती, पण परत आली नाही. यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान मुलीचा प्रियकर तिचं सोशल मीडिया अकाउंट वापरत होता आणि व्हॉट्सअ‍ॅपवरुन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधत होता. मुलगी जिवंत असल्याचं तो भासवत होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना संशय आल्यानंतर त्यांनी बोईसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तपासादरम्यान आरोपीने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह भिंतीत पुरला असल्याचं उघड झालं. आरोपी चार महिन्यांपासून त्याच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो असंही समोर आलं आहे. ज्या भिंतीत मृतदेह पुरला ती भिंतही आरोपीनेच उभारली होती. या सर्व घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 11:20 am

Web Title: a man kills girlfriend and hides body in wall in palghar sgy 87
Next Stories
1 मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाई
2 गावांचा ‘पाणीभार’ शहरांवर!
3 वसईत ७ हजार लशी, ५ हजार जणांची नोंदणी
Just Now!
X