25 September 2020

News Flash

कुंचल्यातून अमर प्रेमाच्या रंगकथा!

श्रीकृष्ण-राधेचा प्रेममय संवाद, मेघदूतातील यक्ष आणि यक्षिणीचा, दुष्यंत-शकुंतलेचा विरह भावना दर्शविणारा संवाद, शिवाशी तदरूप होऊन संवाद साधणारी पार्वती..

| June 23, 2015 05:28 am

श्रीकृष्ण-राधेचा प्रेममय संवाद, मेघदूतातील यक्ष आणि यक्षिणीचा, दुष्यंत-शकुंतलेचा विरह भावना दर्शविणारा संवाद, शिवाशी तदरूप होऊन संवाद साधणारी पार्वती.. इतिहास आणि पुराणातील प्रेमकथा तैलचित्रांच्या माध्यमातून बदलापुरातील सचिन झुवाटकर या चित्रकाराने रेखाटल्या आहेत. मुंबई येथील नेहरू कला दालनात झुवाटकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते, त्यास अनेक चित्ररसिकांनी गर्दी केली आहे.
सचिन झुवाटकर यांनी चार वर्षांपूर्वी ‘प्रेम – एक समर्पण’ या विषयावर काम सुरू केले होते. या विषयावर चित्र प्रदर्शन केल्यावर दोन वर्षे या विषयावर चिंतन, अभ्यास व सराव केल्यानंतर त्यांनी ही  चित्रे चितारली आहेत. सिने अभिनेता आदिनाथ कोठारे, मराठी बाणाचे अशोक हांडे यांनी या  प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शर्मिला ठाकरे यांनी, तसचे अभिनेता मिलिंद गवळी, संगीतकार लहू-माधव यांनी प्रदर्शनाला उपस्थिती लावली होती. प्रदर्शनात २३ चित्रे होती व त्यातील सात चित्रांची विक्री झाली.

भक्ती, संगीत आणि प्रेम या विषयांकडे पाहतांना मला जाणवलं की विरहातील संवाद आणि भावनेच्या जगात संवाद साधायची वेगवेगळी साधने आहेत आणि यावरच आधारित ही चित्रे आहेत.
 – सचिन झुवाटकर, चित्रकार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 5:28 am

Web Title: a painting exhibition at nehru centre art
Next Stories
1 पोलीस गस्त बंद, चोऱ्यामाऱ्या सुरू
2 अनंत गद्रे यांच्या व्यावसायिक कर्जासंबंधी पुस्तकाचे प्रकाशन
3 पितृदिनी टिटवाळ्यात आदर्श वडिलांचा सत्कार
Just Now!
X