20 January 2021

News Flash

…अन् अखेर वैतागून आईनेच केली लहान मुलाची हत्या; कसारा घाटात टाकून दिला मृतदेह

१५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

आईनेच आपल्या मोठ्या मुलासोबत मिळून लहान मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जानेवारीला मुलाचा मोठा भाऊ शिवाजी आंगळे आणि त्याच्या आईने धारदार शस्त्राने हत्या करण्याचा कट रचला. ठाण्यातील चिराग नगरमध्ये हे कुटुंब वास्तव्यास होतं. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी मृतदेह एका प्लास्टिक बॅगमध्ये भरला आणि वाहनाने कसारा घाटात पोहोचून टाकून दिला.

महिलेने पोलिसांना आपल्याला ९ जानेवारीला मुलाचा मृतदेह कसारा घाटात सापडल्याचा फोन आल्याची खोटी माहिती दिली. मुलाच्याच मोबाइलवरुन आलेल्या फोनवर सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आणि कपडे सापडल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा महिलेने पोलिसांकडे केला. यानंतर आपण आपल्या मोठ्या मुलासोबत तात्काळ घटनास्थळी पोहोचली असंही महिलेने सांगितलं.

तपासादरम्यान पोलिसांना महिला आणि तिच्या मुलावर संशय आला. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, “तो काही काम करत नव्हता. सतत पैसे मागायचा आणि नाही दिलं तर मारहाण करण्याची धमकी द्यायचा”. पोलिसांना आई आणि मुलाला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 12:16 pm

Web Title: a woman kills younger son with help of elder son in thane sgy 87
Next Stories
1 मीरा-भाईंदर महापालिकेची १०० कोटी करवसुली
2 लोंबकळत्या वीजवाहक तारांचा धोका कायम
3 रुग्णालयांचे पुनर्परीक्षण
Just Now!
X