11 August 2020

News Flash

विरोधी पक्ष केवळ टीका करण्यात दंग – आदित्य

मुंबई पालिका हद्दीत पालिकेची पथके घराघरांत सर्वेक्षणासाठी पोचली आहेत.

संग्रहित छायाचित्र

कल्याण : करोनाकाळात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातील मंडळी सरकारवर टीका करत राज्यभर फिरत आहेत. ते सध्या आपत्ती पर्यटनात व्यग्र आहेत, असा टोला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला. विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा आम्ही लोकांना अधिकाधिक मदत कशी करता येईल आणि प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहील यावर भर देत आहोत, असेही ते म्हणाले.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील करोना रुग्णांची वाढती संख्या आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मंत्री ठाकरे यांनी कल्याणमध्ये नवी मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर आणि उल्हासनगर पालिका आयुक्तांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, की प्राधिकरण क्षेत्रातील करोना फैलाव आटोक्यात आणायचा झाल्यास प्रशासकीय गतिमानता आणि वैद्यकीय उपचारांची तत्परता आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्राधिकरण क्षेत्रात खाटांची संख्या, कृत्रिम श्वसनयंत्रणा, प्राणवायू आणि रुग्णवाहिका वाढविण्यावर आम्ही भर देत आहोत.

मुंबई पालिका हद्दीत पालिकेची पथके घराघरांत सर्वेक्षणासाठी पोचली आहेत. तीच पद्धत इतर पालिकांमध्ये कशी राबविता येईल, याचा विचार बैठकीत करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष सरकारवर संधी मिळेल तेव्हा टीका करीत आहेत. राज्याचे काही बरेवाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील पहिला विरोधी पक्ष असेल, अशी टीका ठाकरे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 3:31 am

Web Title: aaditya thackeray slams opposition for targeting government over coronavirus zws 70
Next Stories
1 ठाणेकरांच्या व्यायामावरही पालिकेचे निर्बंध
2 ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदीला मुदतवाढ
3 विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक, दया नायक यांची धडक कारवाई
Just Now!
X