26 September 2020

News Flash

Aarey protest : आरेमधील वृक्षतोडी विरोधात तुरुंगात टाकलेल्या आंदोलकांची सुटका

वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या २९ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती.

आरेमधील वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून रात्री उशिरा सुटका करण्यात आली. वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या २९ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती.

शनिवारी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, काल कोर्टाने सर्वांना जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, आरेमधील झाडे रात्रीच्य़ावेळी कापून टाकण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी प्रचंड प्रमाणात आक्रोश व्यक्त करत शनिवारी आरेपरिसरात जोरदार आंदोलन केले होते. त्यांनतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 1:28 am

Web Title: aarey protest people release from thane jail abn 97
Next Stories
1 कमळाचे बटण दाबले; तर पाकिस्तानात अणुबॉम्ब पडेल!
2 प्रदीप शर्मा यांची मालमत्ता एक कोटी ८१ लाख
3 उड्डाणपुलावर मध्यरात्री मद्य मेजवान्या
Just Now!
X