22 September 2020

News Flash

माहिती अधिकाराचा गैरवापर; ठाण्यात गुन्हा दाखल

मात्र, त्याची मागणी विकासकाने फेटाळल्याने मिलिंदने पुन्हा प्रकल्पविरोधात माहिती अर्ज करण्यास सुरुवात केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

माहिती अधिकाराचा गैरवापर करून विकासकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मिलिंद कुवळेकर याच्याविरोधात खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. विकासकाने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोपरी येथील चेंदणी भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे विकासक म्हणून ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, याच भागात राहणाऱ्या मिलिंद कुवळेकर याने २०१७ मध्ये माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रकल्पाची माहिती मागविली होती. त्यानंतर या माहिती अधिकाऱ्याच्या माहितीवरून मिलिंद याने खोटे तक्रारी अर्ज केल्याचे विकासकाचे म्हणणे होते.

वर्षभरापूर्वी या प्रकल्पाविरोधात मिलिंदने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते.  तक्रारी मागे घेण्यासाठी मिलिंदने एक फ्लॅट आणि प्रकल्प बांधकाम होईपर्यंत ९ हजार रुपये दरमहा भाडय़ाची मागणी विकासकाकडे केली होती.

मात्र, त्याची मागणी विकासकाने फेटाळल्याने मिलिंदने पुन्हा प्रकल्पविरोधात माहिती अर्ज करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून विकासकाने मिलिंदची भेट घेतली. या भेटी दरम्यान, मिलिंदने त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. मिलिंदने १ लाख रूपये घेतल्यानंतर

पुन्हा विकासकाच्या कार्यालयात येऊन एका फ्लॅटची मागणी सुरू केली. अखेर याप्रकरणी विकासकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मिलिंद विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 5:04 am

Web Title: abuse of the right to information akp 94
Next Stories
1 ठाणे स्थानकातून अपहरण झालेल्या प्राजक्ताची सुटका
2 शक्तिप्रदर्शनांचा वाहतुकीला फटका
3 कलानींकडून भाजप वेठीस
Just Now!
X