News Flash

अंबरनाथमध्ये ब्रेक फेल झालेल्या ट्रकची रिक्षाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू 

तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु

हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

अंबरनाथमध्ये सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या ट्रकने  रिक्षा आणि कारला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक आणि ट्रकमधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

अंबरनाथ पूर्व भागातील नवरे नगर परिसरात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला. नवरे परिसरातील गोदरेज कंपनीच नवीन बांधकामं सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट पुरवण्यासाठी मिक्सरची या परिसरात दिवासभर ये-जा सुरू असते. बुधवारी भरघाव वेगाने धावणारा मिक्सर ट्रक नवरे नगरमधून खाली येत असताना त्याचे ब्रेक निष्क्रिय झाल्याने  रिक्षा आणि कारला येऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती, की यात रिक्षेचा पूर्ण चक्काचूर झाला. या दुर्घटनेत रिक्षाचालक आजीज शेख उर्फ समीर याचा मृत्यू झाला, तसेच  ६ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा ही समावेश आहे.  रिक्षाला धडक देण्याआधी हा मिक्सर ट्रक एका  इलेक्ट्रिक खांबालाही धडकला. यावेळी मिक्सरमधील क्लिनर जागीच ठार झाला. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 9:28 pm

Web Title: accident due to break fail cement mixer truck two died in ambarnath
Next Stories
1 विठ्ठलवाडी स्थानकात रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला
2 ठाण्यातील मैदान बिल्डरला ‘दान’
3 स्थानक परिसरात पहिले पाढे पंचावन्न!
Just Now!
X