News Flash

नऊ महिन्यांनंतर अत्रे नाटय़ मंदिराचा पडदा वर

मार्चमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर नाटय़गृहे बंद करण्यात आली होती.

(संग्रहित छायाचित्र)

कल्याण : सामाजिक अंतराचे पालन करीत, करोना संसर्गाचे सर्व नियम पाळत कल्याणमधील आचार्य अत्रे नाटय़ मंदिर नाटय़ निर्माते, नाटय़रसिकांसाठी शनिवारी खुले करण्यात आले. ‘तू म्हणशील तसं’ हा नाटकाचा प्रसाद ओक दिग्दर्शित, प्रशांत दामले निर्मित पहिलाच प्रयोग करोना महासाथीमुळे नऊ महिन्यांनंतर प्रथमच नाटय़गृहात सादर करण्यात आला.

मार्चमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर नाटय़गृहे बंद करण्यात आली होती. नऊ महिन्यांनंतर करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने नाटय़गृहे सुरू करावीत. कलाकारांची आर्थिक परिस्थिती कार्यक्रम बंद असल्याने नाजूक होत चालली आहे. पडद्यामागील कामगारांची आर्थिक ओढाताण होत असल्याने नाटय़गृह सुरू करण्याची मागणी नाटय़ निर्मात्यांनी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई, कल्याणमधील अत्रे रंगमंदिर नाटय़निर्माते, रसिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. सावित्रीबाई फुले रंगमंदिर २० डिसेंबरपासून खुले होत आहे. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आयुक्त सूर्यवंशी सपत्नीक उपस्थित होते. दोन्ही शहरांत रसिक नाटय़प्रेमी अधिक संख्येने आहेत. करोनामुळे अनेक महिने घरात बसल्यानंतर रहिवाशांना मनोरंजन कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला पाहिजे हा विचार करून, नाटय़ कलाकारांच्या मागणीचा विचार करून नाटय़गृहे सुरू करण्यात आली आहेत, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्रे नाटय़गृहात एक आसन सोडून एक प्रेक्षक बसेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक नाटय़प्रयोगानंतर नाटय़गृह र्निजतुक केले जाणार आहे. नाटय़ कलाकार संकर्षण क ऱ्हाडे यांनी आयुक्त, त्यांच्या पत्नीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला अत्रे नाटय़ मंदिराचे व्यवस्थापक माणिक शिंदे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:17 am

Web Title: acharya atre natya rangmandir in kalyan opens up with a marathi play zws 70
Next Stories
1 निवडणुकांच्या तोंडावर उल्हासनगर रिपाइंत फूट?
2 नेतिवली टेकडी नवीन झोपडय़ांच्या विळख्यात
3 गडकरी रंगायतनची इमारत अतिधोकादायक
Just Now!
X