19 September 2020

News Flash

रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर बडगा

गेल्या महिनाभरातील चौथ्या कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एका कंपनीला बंदीची नोटीस; महिनाभरातील चौथी कारवाई

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरुवात केली असून प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याने ‘इंडाको जिन्स’ या कंपनीला बंदीची नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्या महिनाभरातील चौथ्या कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रात पाहणी केली असता ‘इंडाको जिन्स’ या कारखान्यातून जिन्स वॉशिंग प्रक्रियेचे रासायनिक पाणी जमिनीखालून पाइपाने नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तेथील रासायनिक सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. तपासणी अहवाल आल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी या कारखान्यांवर उत्पादन बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. महिनाभरात औद्योगिक क्षेत्रातील चार प्रदूषणकारी कारखान्यांना नोटीस बजावली आहे.

कारवाईचे कारण

* सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा निचरा करणे बंधनकारक, मात्र या कंपनीने प्रक्रिया न करताच पाणी नाल्यात सोडले.

* पाण्याचा पीएच उच्च अल्कालाइन मात्रा असलेला. इंडाको जिन्स कारखान्यांवर बंदीची नोटीस बजावली आहे, त्याशिवाय औद्योगिक महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाला आणि महाराष्ट्र वीजवितरण कंपनीला विद्युतपुरवठा खंडित करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

– मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:31 am

Web Title: action on chemical factories sewage disposal
Next Stories
1 देयकांची रक्कम परत मिळणार
2 मध्य, ट्रान्स हार्बरवर उद्या मेगाब्लॉक
3 डोंबिवलीत डॉमिनोज पिझ्झा सेंटरला भीषण आग
Just Now!
X